पनवेल: आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटला तरी राज्य सरकार लक्ष देत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पोलीसांना साकडे घालून प्रतिघात्मक रास्तारोको १० मिनिटांसाठी करु देण्याचे आवाहन केले. सोमवारी दुपारी आंदोलकांनी ठरल्याप्रमाणे १५ मिनिटे गोवा मुंबई महामार्ग रोखला. काही मिनिटांत आंदोलनानंतर पुन्हा उपोषणठिकाणी शेतकरी एकवटले. या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार सिडको मंडळाचे काही अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले होते. २३ डिसेंबरनंतर या संदर्भात भेट लावू असे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. मात्र आंदोलकांना दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारीच नागपूर आधिवेशनाच्या ठिकाणी विरोधी गटाच्या पक्षनेत्यांना भेटून येथील परिस्थिती सांगणार असल्याचे माजी आ. पाटील यांनी सांगीतले. मागील सहा दिवसांपासून आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलक संतापले असल्याचे माजी आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
woman self help groups marathi news
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल
highway projects in Maharashtra
‘भक्तिपीठ’ आणि ‘औद्योगिक’ महामार्गांचेही भवितव्य अधांतरी
Mumbai, Metro 2A, Metro 7, Ganesh utsav,
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ; २० अतिरिक्त फेऱ्या
ST traffic disrupted in Nashik section due to agitation plight of passengers
आंदोलनामुळे नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर

हेही वाचा… नातेवाईकाची तब्येत पाहण्यासाठी आलेल्या महिलेचे चार लाखांचे दोन मंगळसूत्र चोरले

शेतकऱ्यांनी पनवेल तालुक्यातील तुरमाळे गावाजसमोरील गोवा मुंबई महामार्गालगत मंडप उभारुन आमरण उपोषणासाठी ठाण मांडून बसले आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता रोखला मात्र काही मिनिटात रास्तारोकोतून माघार घेत शेतकऱ्यांनी वाहतूक खुली करण्यास पोलीसांना सहकार्य केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत हे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते.