लोकसत्ता टीम

पनवेल : पनवेल बस आगारातून पेणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना प्रवाशाची ७० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. या चोरीची माहिती प्रवाशाला उशीराने समजली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. २५ एप्रीलला पनवेल ते पेण या पल्यावर ३६ वर्षीय विशाल पाटील हे एसटीने प्रवास करण्यासाठी पनवेल बस आगारात गेले होते. रात्री सव्वा सात वाजता विशाल आगारातील फलाट क्रमांक १ येथील पेण बसमध्ये चढताना विशाल यांची १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल
pune burglaries marathi news
पुणे : तीन घरफोड्यांत साडेसहा लाखाचा ऐवज चोरीला
jewellery stolen thane
ठाणे स्थानक परिसरातील सराफाच्या दुकानात दरोडा, कोट्यवधीचे दागिने चोरीला
Gold imports hit record high of Rs 1480 crore in November
सोन्याची नोव्हेंबरमध्ये विक्रमी १,४८० कोटींची आयात ,व्यापार तुटीत भर
pune pedestrian threatened
पुणे : पादचाऱ्याची चोरट्यांशी झटापट; दुचाकी सोडून चोरटे पसार – लष्कर भागातील घटना

महिना भरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर विशाल यांनी पोलीसांत तक्रार दिली. पनवेल शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिन्या भरापूर्वी शहरातील मिडलक्सास सोसायटीमध्ये एका घरात दोन महिलांनी घरात शिरुन चोरी केली होती. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सूमारास घरात सारे असताना या चोरट्या महिलांनी स्वतःकडे लहान बाळ घेऊन घरात प्रवेश केला. घरातील सर्व सदस्य कामात गुंतले असताना ही चोरी सकाळच्या सूमारास झाली होती. या घरातून ७७ हजार रुपयांचे मोबाईल या महिलांनी चोरले होते.

आणखी वाचा-सट्टा बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ७ लाखांची फसवणूक 

या घटनेनंतर पनवेल शहर पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. निवडणूकीच्या बंदोबस्तामुळे ताणाखाली असणाऱ्या पोलीसांना शालेय सुट्यांमुळे अनेक नागरिक घरांना कुलूप लावून पर्यटनासाठी बाहेर जात असल्याने पोलीसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Story img Loader