नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारात सीताफळाची अवाक वाढली असून गोल्डन नामक जातीच्या सीताफळाच्या मागणीतही वाढ होत आहे. मोसमी फळ असलेल्या सीताफळाची जानेवारीपर्यंत अशीच आवक राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – उरणच्या नव्या तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव, ५३ कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी
हेही वाचा – नवी मुंबई: तळोजा येथील केम्सपॅक कंपनीला भीषण आग
सीताफळात गोल्डन सीताफळाची आवक सुरू झाली आहे. रोज अंदाजे ४५० क्विंटलची आवक होत असून मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याची माहिती फळ व्यापारी राहुल डेरे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधून सर्वाधिक आवक होत आहे. गोल्डन, सरस्वती या जातींची सीताफळे येत आहेत. ठोक बाजारात ३० ते ४० रुपये किलो तर किरकोळ बाजारात शंभर रुपयांच्या आसपास प्रतिकिलो दर आहेत.