उरण : तालुक्यातील महत्वाच व पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण असलेल्या पिरवाडी किनाऱ्यावर सुरक्षेसाठी व्यवस्था करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. शासनाने महसूल विभागाच्या माध्यमातून पर्यटक आणि किनाऱ्यावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला टेहळणी मनोरा कोसळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा किनाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण तालुका हा औद्योगिक शहर आहे. त्यामुळे तालुक्या बाहेरून येणाऱ्या अनेक पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. सुट्टीच्या आणि इतरही दिवशी मोठ्या संख्येने स्थानिक आणि पर्यटक पिरवाडी किनाऱ्यावर येतात. अनेक पर्यटक हे समुद्रात पोहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी पर्यटक आणि नवख्यांना समुद्राचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या घटना याआधी किनाऱ्यावर घडल्या आहेत. यानंतर शासनाने किनारा सुरक्षेची काही नियमावली ठरविली आहे. यात सुरक्षा रक्षक व त्याच्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

किनाऱ्यावर सुरक्षेसाठी नवी मुंबई किनारा पोलीस व रायगड सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मात्र त्यांची संख्या अपुरी आहे. यातही वाढ करण्याची मागणी स्थानिकाकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून पिरवाडी किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा उभारला आहे. मात्र या बंधाऱ्याचे दगड ही निखळू लागले आहेत