२०११ च्या जनगणनेत झालेल्या लोकसंख्येच्या विभाजनाच्या तांत्रिक अडचणीमुळे पनवेल तालुक्यातील कामोठे, कळंबोली या सिडको वसाहतींलगतच्या १३ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला होता. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे प्रभाग रचना व आरक्षणाचा विशेष कार्यक्रम महसूल विभागाने लगबगीने हाती घेतला असून लवकरच या नवीन प्रभाग रचनेनूसार अनेक वर्षांपासून निवडणुकांपासून वंचित असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मे अखेपर्यंत निवडणूका होणार आहेत. आहे.
गुरुवारी सायंकाळी १३ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांना बोलावून त्यांना पनवेलच्या महसूल विभागाने पुन्हा एकदा प्रभाग रचना व आरक्षणाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी कळंबोली वसाहतीचा समावेश कळंबोली ग्रामपंचायतीमध्ये करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून वंचित असलेल्या वसाहतीमधील सुमारे ५० हजार मतदारांना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा मिळू शकतील. तसेच नावडे व रोडपाली येथील नवीन मतदारांनाही ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल.
१३ एप्रिल रोजी संबंधित आरक्षित जागांवरील सोडत पद्धतीने प्रभागाचे आरक्षण ठरविले जाईल. १६ एप्रिलपर्यंत आरक्षण विषयी हरकती मागविल्या जातील. ५ मे ला मतदारांच्या हरकतींवर प्राधिकृत अधिकारी आपला अंतिम निर्णय जाहीर करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा