मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या वाटाण्याची आवक कमी होत असून दर वधारले आहेत. एक महिन्यांपासून दर आवाक्यात आले होते, परंतू मंगळवारी पुन्हा बाजारात वाटाण्याची आवक घटल्याने दरात प्रतिकिलो १०रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात आधी प्रतिकिलो ६०-६५रुपयांनी उपलब्ध असलेला वाटाणा आता ७०-७५रुपयांनी विक्री होत आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबर महिन्यात मोठया प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होण्यास सुरुवात होत असते,शिवाय डिसेंबरमध्ये वाटण्याचा खरा हंगाम सुरू होतो तर वर्षभर तुरळक वाटाणा दाखल होत असतो.
हेही वाचा >>> नवी मुंबईत पाणीवाटपात विषमता; बेलापूर,नेरुळला मुबलक तर दिघ्यात दुर्भिक्ष्य; पाणी वापराने नवी मुंबईत पाणीबाणी
बाजार समितीत मध्य प्रदेशातून हिरवा वाटाण्याची आवक होते. मात्र सध्या एपीएमसीत राज्यातील सातारा ,नाशिक येथील वाटाणा दाखल होत आहे. मागील एक महिन्यांपासून घाऊक बाजारात वाटाणा ४०रुपयांपर्यंत उतरला होता. मात्र बाजारात आता पुन्हा हिरव्या वाटाण्याची आवक २०% ते २५% घटली आहे, त्यामुळे दरात १०रुपयांनी वाढ झाली आहे. आधी ६०-६५रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारा वाटाणा आता ७०-७५रुपयांनी विकला जात आहे. पुढील कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून दरात वाढ होणार आहे, अशी माहिती व्यापारी संतोष नवले यांनी दिली आहे.