५ टक्के कर लागू झाल्याने तिकिटाच्या दरांत वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) एसी बसला वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) फटका बसला असून, दोन दिवसांपासून एसी बसचा प्रवासही महाग झाला आहे. त्यामुळे एसी बसने प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एसी बसच्या तिकिटाच्या दरात ५ टक्के जीएसटीमुळे वाढ झाली आहे. २० रुपयांचे तिकीट २१ रुपये तर १४० रुपयांचे तिकीट  १४७ रुपये झाले आहे.

परिवहन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसी बसचे तिकीट दर कमी करण्यात आले होते आणि साध्या बसच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली होती. एसी बसला ‘ओला’ व ‘उबर’ या खसगी सेवांचा फटका बसत असल्याने एसी बसचे भाडे कमी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. एसी बसच्या दरांत १० ते १५ रुपयांनी कपात झाली होती. पण आता एसी बसला जीएसटी लागू झाल्यामुळे एसी बसच्या तिकीट दरांत पुन्हा ५ टक्के वाढ झाली आहे.

एसी बसला जीएसटी लागू करण्यात येऊ नये, असा पत्रव्यवहार पालिकेने शासनाला केला होता. पण शासनाकडून ही विनंती अमान्य करण्यात आल्यांनतर १७ जुलैपासून एसी बस प्रवासावर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी स्पष्ट केले.

‘एसी बसच्या तिकीट दरांत कपात करून साध्या बसच्या भाडय़ात वाढ करण्यात आली होती. पण आता जीएसटीमुळे एसी बसच्या भाडय़ातही वाढ झाली आहे. त्यामुळे एसी बसचे तिकीट दर पुन्हा पूर्वीएवढेच झाले आहेत,’ अशी माहिती  परिवहन सदस्य समीर बागवान यांनी दिली.