मुंबई : शीव पनवेल महामार्गावर मुंबईकडे गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पकडला असून यात तब्बल ९ लाखांचा गुटखा आढळून आला आहे. या प्रकरणी गुटखा जप्त केला असून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सैफ नौशाद अहमद शेख आणि सिद्धू अण्णाप्पा बोधाने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी पहाटे शीव-पनवेल मार्गावरून एक टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता. वाशी येथे आल्यावर पोलिसांनी सदर टेम्पो नियमित तपासणीसाठी अडवला. त्यावेळी चालक आणि शेजारी बसलेल्या आरोपींना व्यवस्थित उत्तरे देता न आल्याने पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला.

आणखी वाचा- नवी मुंबई : मित्रांसोबत मद्य घेतले आणि मित्रानेच घरात चोरी केली 

पांढऱ्या रंगाच्या २० गोणीत प्रत्येकी चार हजार रुपये किंमत असलेले १९२ पुडके तसेच गुलाबी रंगाच्या चार गोणीत जाफरानी जर्दा लिहिलेले प्रत्येकी ४८ रुपयांचे ४१ हजार पुडके मिळून आले. या सर्वांची किंमत ९ लाख ६० हजार रुपये आहे. हा सर्व गुटखा आणि टेम्पो जप्त केला असून आरोपींना अटक केली आहे.

Story img Loader