पनवेल : Navi Mumbai Weather Forecast समुद्र सपाटीपासून तीन मीटर उंचीवर खांदेश्वर रेल्वेस्थानक उभारल्यानंतरही प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी पाय आणि पादत्राणे भिजवूनच स्थानकात जावे लागते. प्रत्येक पावसाळ्यात या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. नियोजनबद्ध शहरांचे शिल्पकार अशी नवी मुंबईची ओळख आहे. मात्र रेल्वेस्थानकातून प्रवास केल्यावर सिडको महामंडळाचा हा दावा फोल ठरल्याचे चित्र सध्या खांदेश्वर स्थानकातून प्रवास करताना अनुभवायला मिळते.

पावसाळ्यात पाऊस कमी झाला कींवा जास्त तरी खांदेश्वर स्थानकातील भुयारी मार्गात पाणी साचते. या पाण्याविषयी प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यावर मोटार पंप या ठिकाणी लावून साचलेले पाणी उपसले जाते. मागील अनेक वर्षे पावसाळ्यात मोटारपंप लावणा-या कंत्राटदाराचा यामध्ये लाभ झाला असेल मात्र हजारो प्रवाशांना पाय भिजवूनच प्रवास करण्याची शिक्षा मिळाली आहे.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
minimum temperatures in mumbai reached 18 degrees on tuesday
Mumbai Weather Today : तापमानाचा पारा वाढला
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Mumbai minimum temperature, Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
Maharashtra winter updates loksatta news
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार ? जाणून घ्या, हवामान विभागाचा पावसाचा, थंडीचा अंदाज
Minimum temperature in Mumbai above average Mumbai print news
मुंबईतील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक
Light showers forecast in Mumbai Thane Palghar due to Fengal Cyclone Rain in some areas
मुंबईत आज हलक्या सरींचा अंदाज

हेही वाचा >>> Weather Updates : घणसोली रेल्वे स्थानक पाण्यात, पावसाळ्यात प्रवाशांना करावा लागतोय असा प्रवास…

मागील अनेक वर्षे कामोठे येथील सीटीझन युनिटी फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर हे दरवर्षी सिडको मंडळाकडे पाठपुरावा करुन येथी यंत्रणा कार्यान्वित करतात परंतू सडोलीकर यांनी दिलेल्या माहितीनूसार दरवर्षी हे पाणी साचणार माहित असूनही येथील स्थानक प्रबंधक, सिडकोचे अधिकारी पावसाळ्यापुर्वी याचे नियोजन का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच स्थानकातून रोज प्रवास कऱणारे राज हांदे यांनी सध्या साचलेल्या पाण्याला वाटरपार्क अशी उपरोधिक टीका करुन हे छायाचित्र समाजमाध्यमांवर राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित विभागांना पाठविले आहे.

Story img Loader