देशातील पहिले उद्यान;  ७ कोटी रुपये खर्च करण्याची पालिकेची तयारी

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या नवी मुंबई पालिका आता सानपाडा जुईनगर सेक्टर १० येथे सहा एकरवर केवळ अपंग  व विशेष विद्यार्थ्यांसाठी आगळंवेगळं उद्यान विकसित करणार आहे. यासाठी ७ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेने ठेवली असून अशा प्रकारचे देशात पहिले उद्यान असणार आहे.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
bsc nursing admission 1600 posts
राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई

नवी मुंबई पालिकेने वाशी सेक्टर ३० येथे या या मुलांसाठी खास अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र उभारलेले आहे. पालिकेने केलेल्या या कामाचा गौरव केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेने या केंद्राला ‘अ’ प्रमाणपत्र दिले आहे. अंपगांना समान संधी, संरक्षण आणि सहभाग राहावा यासाठी पालिकेने अनेक सुविधा एकाच छताखाली उभारलेल्या आहेत.

आता या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी एक विशेष उद्यानाची उभारणी सानपाडा जुईनगर सेक्टर १० येथील उद्यानाच्या मोकळ्या जागेत करणार आहे. या विशेष मुलांना केवळ स्पर्शाने खेळाचे साहित्य, फळे, फुलांचे आकलन होईल असे सेन्सर या उद्यानात ठेवले जाणार असून त्यासाठी दोन सल्लागार नेमण्यात आलेले आहेत. यासाठी पालिका सात कोटी रुपये खर्च करणार असून पुढील वर्षी या उद्यानाच्या विकासाला सुरुवात केली जाणार आहे. अपंगांसाठी उभारण्यात येणारे हे देशातील विशेष उद्यान राहणार आहे.

पालिकेचे ‘ईटीसी’ केंद्र हे देशात लक्षवेधी असून राज्य व केंद्र सरकारडून त्याची दखल घेतली गेली आहे. या मुलांनाही समान संधी देण्याचा पालिकेचा प्रयत्न राहिला आहे. शहरातील नागरिकांसाठी २०० पेक्षा जास्त उद्याने आहेत. या मुलांसाठी आधुनिक असे विशेष उद्यान विकसित करणार आहे. हा देशातील पाहिला प्रयोग आहे.

-डॉ.रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई पालिका.