भारतीय संस्कृतीच्या आकर्षणापायी कॅनडा देशाची रहिवासी असलेल्या महिलेने  भारतीय व्यक्तीशी विवाह केला. मात्र, तिच्या नशिबी सासुरवास आला. अखेर रोजचा छळ आणि जादूटोणा करण्याच्या धमक्यांना कंटाळून तिने पती आणि सासू विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या बाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा- शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद; केबल खराब झाल्याने अंधार

कॅनडा देशाची नागरिक असलेल्या एका युवतीला भारतीय संस्कृती विषयी आपुलकी होती. तिला ही संस्कृती आवडत असल्याने तिने एका भारतीय व्यक्तीशी विविह करण्याचा निर्णय घेतला. एका सामाईक ओळखीतून तिचा परिचय वाशीतील राकेश  शर्मा याच्याशी झाला. त्याने स्वतःला सिने अभिनेता असल्याची ओळख करून दिली होती. पुढे २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला. सुरवातीचे काही दिवस सोडले तर आकाश आणि त्याच्या आईने सार्वजन कॅनडा येथेच सेटल्ड होऊ असे सांगत तिला कॅनडा येथे जाण्याचा आग्रह सुरु केला. मात्र, तिला भारतातच राहण्याची इच्छा असल्याने तिने यास नकार दिला आणि तेथूनच छळ सुरु झाला. तिला जादू टोना करण्याची भीतीही घालण्यात आली. या भीतीत तिने अनेक वर्ष काढल्यावर शेवटी असह्य झाल्याने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याबाबत तपास करून पाउले उचलले जातील अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली

Story img Loader