बेलापूर येथील कोकण भवनच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर संरक्षक भिंत भेदून फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्या मोकळ्या भूखंडावर चोहोबाजूंनी संरक्षक भिंती बांधून फेरीवाले यांच्यावर चाप बसविला होता. मात्र फेरीवाल्यानी ती भिंत तोडण्याचा प्रताप केला त्याठिकाणी पुन्हा आपले बस्तान मांडले आहे.

सिडको आणि पालिकेकडून अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते मात्र पाठ फिरताच पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. या मोकळ्या भूखंडावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना अटकाव घालण्यासाठी याठिकाणी दोन ते तीन वेळा ही संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु फेरीवाल्यांनी भिंतीचा दर्शनी भाग तोडून मोकळ्या भूखंडावर पुन्हा आपला व्यवसाय सुरू केलेला आहे.

Story img Loader