ठोस उपायोजना न झाल्याने परिस्थितीत बदल नाही

खारघर वसाहतीमधील फेरीवाल्यांनी अद्यापही वसाहतीमधील रस्त्याचा आणि पदपथाचा ताबा सोडलेला नाही. सिडको प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई केली, मात्र ही कारवाई तात्पुरती असल्याचे समोर आले आहे. या प्रश्नी कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने वसाहतीमधील पदपथ व रस्त्यांवर फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर आठवडाबाजार बसवून स्थानिक नेते या फेरीवाल्यांकडून मिळणारे भाडे खिशात घालतात अशी चर्चा रंगू लागली आहे.

खारघरमध्ये रस्त्याच्या कडेला व पदपथावर, चौकाचौकात टपरी व फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. जानेवारी महिन्यात सिडको प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र, काही नेत्यांनी सिडकोच्या पथकावर हल्ला करून या कारवाईत अडथळा निर्माण केला. यानंतर खारघर सीटीझन फोरमच्या सदस्यांनी लोकवर्गणी काढून सिडकोच्या रिकाम्या भूखंडावर शोभेची रोपे लावली. भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा लिना गरड यांनी पदपथावर बसण्यासाठी बाके बसविली. तरीही रस्त्याच्या कडेची जागा व पदपथ हे फेरीवाल्यांच्या ताब्यात आहे.

हिरानंदानी येथील बिकानेर स्वीटपासून ते थ्रीस्टार हॉटेलपर्यंतच्या रांगेत रोज सायंकाळी फेरीवाले बसलेले दिसतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. काही वर्षांपूर्वी याच वसाहतीमध्ये चायनिज व्यवसाय करणाऱ्या चालकाकडून पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना ठाणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या घटनेनंतर वसाहतीमधील फेरीवाले कमी होण्याऐवजी वाढले आहेत. खारघर फोरम या संघटनेने अनेकदा आवाज उचलला होता, मात्र तो आवाज काही स्थानिक नेत्यांनी दाबून टाकल्याची चर्चा आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील फोरमला पाठींबा देत खारघरमधील अवैध फेरीवाल्यांविरोधात कारवाई व्हावी ही भूमिका घेतली. त्यानंतर काही काळापुरती फेरीवाल्यांवर कारवाई झाली मात्र त्यानंतर ही मोहीम थांबली.

कारवाई तात्पुरती

खारघरमध्ये रस्त्याच्या कडेला व पदपथावर, चौकाचौकात टपरी व फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. जानेवारी महिन्यात सिडको प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र, काही नेत्यांनी सिडकोच्या पथकावर हल्ला करून या कारवाईत अडथळा निर्माण केला. यानंतर खारघर सीटीझन फोरमच्या सदस्यांनी लोकवर्गणी काढून सिडकोच्या रिकाम्या भूखंडावर शोभेची रोपे लावली. भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा लिना गरड यांनी पदपथावर बसण्यासाठी बाके बसविली. तरीही रस्त्याच्या कडेची जागा व पदपथ हे फेरीवाल्यांच्या ताब्यात आहे.

Story img Loader