२ हजार फेरीवाल्यांकडून कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पदपथ फेरीवाल्यांनी बळकावल्याची बदनामी झाल्यानंतर पालिका प्रशसानाने केलेल्या फेरीवाले सर्वेक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वेक्षणात ७ हजार ३२६ फेरीवाले नोंदले गेले असून २ हजार ३० फेरीवाल्यांनी अद्याप कागदपत्रेच सादर केली नाहीत. तरीही पालिका त्यांना आणखी एक संधी देण्यास तयार आहे.
नवी मुंबईत फेरीवाला सर्वेक्षणाला बेलापूर विभागापासून सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या फेरीत बेलापूर ते दिघा या सर्वच विभागात पहिल्या ३ हजार ७२१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तर दुसऱ्या फेरीचे ३हजार ६०५ असे शहरातील ७ हजार ३२६ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परंतु बायोमेट्रिक सर्वेक्षणानंतर अद्याप २ हजार ३० फेरीवाल्यांनी कागदपत्रच सादर केली नाहीत.
वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, तुर्भेसह सर्वच विभागांतील फेरीवाल्यांची मोठी संख्या वाढली आहे. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटपर्यंतच्या हद्दीत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आल्याचा निर्णय दिला असताना नवी मुंबई शहरामध्ये अजूनही स्थानकाबाहेर फेरीवाले बसतात. शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर न्यायालयाने निर्देश केल्यानुसार फेरीवाल्यांबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. परंतु फेरीवाल्यांनी कागदपत्रच न दिल्याने निर्णय रखडला आहे. कागदपत्रे सादर न केलेल्यांना ती सादर करण्याची मुदत दिली जाणार आहे. विभागनिहाय त्यांना कागदपत्र सादर करण्याचे आवाहन केले आहे.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता पात्रतेचे निकष कोणते लावायचे याबाबत शासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे. पालिकेने पत्रव्यवहारही केला आहे. सर्वेक्षणासह कागदपत्रे सादर केलेल्या फेरीवाल्यांचा डेटा नगर परिषद संचालनालय यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. – रवींद्र पाटील, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका