उरण : शहरालगतच्या डाऊर नगर मध्ये दरड कोसळल्या नंतर येथील दगड व धोकादायक माती शनिवारी हटविण्यात आली आहे. यासाठी उरणच्या नागरी संरक्षण दलाची मदत घेण्यात आली. अशी माहिती उरणच्या तहसीलदारांनी दिली आहे.द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या डाऊर नगर मध्ये गुरुवारी दरड कोसळली होती.
या घटनेची उरणच्या तहसीलदारानी पाहणी करून सुरक्षेच्या कारणास्तव येथील नागरीकांना स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र या परिसरात डोंगरावर असलेल्या एका मोठा दगड व निसरडी माती धोकादायक होती. त्यामुळे ही हटविण्यासाठी नागरी संरक्षण दलाची मदत घेण्यात आल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी दिली.