नवी मुंबई महानगर पालिकेने गेल्या काही वर्षांपासून शून्य कचरा निर्मिती शहर करण्यावर उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु आज ही शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहे. कचरा वर्गीकरण आणि त्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविले जात आहेत. शहरातील गृहसंकुलात ही प्रकल्प राबविले जाते आहेत, त्याच बरोबर नवी मुंबई महापालिकेने शहरातील उद्यानात देखील कंपोस्ट पिट तयार करून खत निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. कोपरखैरणे येथील चिकणेश्वर उद्यानात कचऱ्याचे ढीग, पालापाचोळा ढीग लागलेले आहेत.
हेही वाचा- पनवेल: गावच्या शेतजमिनींवर गृहनिर्मितीसाठी शेतकऱ्यांची एकजूट
उद्यानातून निघणाऱ्या झाडांचा पाळा पाचोळा वाया जावू नये त्यापासून कम्पोस्ट खत बनवले जावे यासाठी प्रत्येक उद्यानात महापालिकेने हे काम्पोस्ट पीट तयार केले आहेत. मात्र सध्याच्या या कंपोस्ट पिटमध्ये सुका कचरा पालापाचोळा न टाकता उद्यानाच्या कोपऱ्यात पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग आहेत. उद्यनात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक उद्यानात येतात.पंरतु उद्यानातील कचऱ्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.