स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात जागो-जागी स्वछता ठेवण्यास महोपालिकेने कंबर कसली आहे. त्या करिताविविध नियोजन आखण्यात येत असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता आणि जनजागृती करण्यात येत आहे. कचरा मुक्त शहर या देशाने नवी मुंबई महानगरपालिका वाटचाल करत असली तरी आजही शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : सायबर सिटीत महिला अत्याचारात वाढ; बहुतांश प्रकरणात जवळचे नातेवाईक परिचितच आरोपी
नवी मुंबई महानगर पालिका कचराकुंडी मुक्त शहराचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अंतर्गत शहरातील सर्व ठिकाणच्या कचराकुंड हटवण्यात आलेल्या आहेत. कचराकुंड्यांमुळे शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त झालेलया कचरा आणि परिणामी दुर्गंधीचे साम्राज्य पसरत होते. त्यामुळे कचरा मुक्त शहराच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम शहरातील सर्व कचराकुंड्या हटवून कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी उपलब्ध केली. मात्र कचराकुंडी मुक्त शहर बनवीत असताना नवी मुबंईतील गाव गावठाणातील कचरा मात्र रस्त्यावर ओसंडून रोगराईला आमंत्रण देत असल्याचे विदारक चित्र सध्या नवी मुंबईत दिसत आहे.
तुर्भे सेक्टर २० येथील सीडब्ल्यूसी वेअर हाऊस जवळ रस्त्याच्या मधोमध दुभाजकाला लागूनच रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. संपूर्ण कचरा रस्त्यावर अस्तव्यस्त पडलेला असतो. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने ही पार्क केली जातात. त्यामुळे एकीकडे वाहने उभी आणि दुसरीकडे रस्त्यावर कचरा त्यामुळे येथील वाहन चालक आणि पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यापासून दुर्गंधी येत असून रस्त्यावरून चालताना नागरिकांना आपले नाक मुठीत धरून वाट काढावी लागत आहे. तर या वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे रोगराईला देखील आमंत्रण मिळत आहे. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत केंद्रीय पथक शहरात येते तेव्हा शहरातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते ..परंतु स्वच्छता सर्वेक्षणाची पाठ फिरताच पुन्हा शहरात जैसे थे परिस्थिती पहावयास मिळत आहे. नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांपर्यंत स्वच्छ शहराबाबत संदेश, जनजागृती करण्यात तोकडी पडत आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.