लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पनवेल: पनवेल तालुक्यामधील ३८ गावातील शेतजमिनीसह अनेक राहत्या घरांशेजारुन विरार अलिबाग बहुउद्देशीय राज्य महामार्ग जात असल्याने या महामार्गातील भूसंपादनात नुकसान भरपाई आणि या मार्गाला विरोध करण्यासाठी अनेकांनी हरकती नोंदविल्या आहेत. पनवेलच्या प्रांताधिकाऱ्यांनी बुधवारी काढलेल्या जाहीर नोटीशीने गावनिहाय हरकतींवर सुनावणीचा कार्यक्रम १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सुनावणीकडे शेतकरी आणि रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
विरार अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेत पनवेल तालुक्यातील अनेक गावांच्या जमिनी बाधित होत आहे. बोर्ले येथील गावक-यांनी शिवसेनेचे गटनेते अंबादास दानवे यांच्याकडे या मार्गिकेतील मोठ्या रस्त्यामध्ये गाव बाधित होत असल्याने मार्गिका वळविण्याची मागणी केली होती. तसेच या सुनावणीकडे विशेष लक्ष्य रिटघर गावातील महालक्ष्मी आंगण फेज वन या गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांचे लागले आहे. ५४ सभासदांनी काही वर्षांपूर्वी या सोसायटीत सदनिका खरेदी केली. बिनशेती परवाना असलेल्या दोन इमारतींमध्ये हे रहिवाशी राहतात. रिटघर गावांतील संबंधित सोसायटीची जमीन याच मार्गिकेत जात असल्याने या रहिवाशांनी हरकतीचा अर्ज प्रांतअधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : सारसोळे इमारत दुर्घटना; पतीचा मृत्यू तर पत्नी अत्यवस्थ
१२ सप्टेंबरला दुपारी तीन वाजल्यापासून रिटघरसह चिंचवली, तर्फे, तळोजे, महाळुंगी, मोर्बे,वाजे या गावांची सुनावणीत नेमके प्रांत अधिकारी मुंडके हे काय भूमिका घेणार याकडे ५४ कुटूंबांचे लक्ष लागले आहे. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेमुळे पनवेल-शीव महामार्ग आणि मुंब्रा-पनवेल, कल्याण-तळोजा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी होणार आहे. विरार अलिबाग मार्गिका मुंबई दिल्ली कॉरीडोरच्या बडोदे-मुंबई महामार्गाला जोडला आहे. विरार अलिबाग मार्गिकेमुळे पनवेलला दळणवळणाची नवी संधी मिळणार असली तरी स्थानिकांच्या हरकतींचे समाधानकारक निवारण झाल्याखेरीज ही मार्गिका करु नये अशी मागणी शेतक-यांच्यावतीने कोंडले गावचे शेतकरी गणेश पाटील यांनी केली आहे.