जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या करळ येथील बहुमार्गी उड्डाणपूलाखाली जड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे उरणच्या करळ पुलाचे रूपांतर कंटेनर वाहनांच्या बस्थानात झालं आहे. अनेक मार्गाना जोडणाऱ्या या उड्डाणपुलाखाली जिथे जागा मिळेल तिथे कंटेनर वाहने उभी करून पुलाखाली जागेचा बेकायदा वाहनतळ म्हणून वापर केला जात आहे. या बेकायदा वाहन तळाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच वाहतूक विभागाकडून ही दुर्लक्ष केले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालल्याने शहररातील तसेच महामार्गावरील उड्डाण पुलाखाली अतिक्रमण करण्यास सक्त मनाई केलेली आहे. तरी देखील आज ही बहुतांशी उड्डाणपुला खाली वाहने उभी केली जात आहेत. दुसरीकडे अद्याप काही उड्डाणपूलांखाली पुलाखाली वाहने उभी करू नये या साठी तयार करण्यात आलेले कठडे तोडून वाहनांचे अतिक्रमण झालेले निदर्शनास येत आहे. यामध्ये करळ मधील उरण पनवेल मार्ग,जेएनपीटी धुतुम मार्ग या पुलाखाली वाहने उभी केली जात आहेत.