लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील भूखंड क्रमांक ३ सी, बी १ येथील केम्सपॅक केमिकल लिमिटेड या रासायनिक कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत तरी जीवितहानी झाली नसल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी दिली.

केम्सपक ही कंपनी सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल पुरवते. आगीचे निश्चित कारण काही समजू शकले नाही. गुरुवारी सायंकाळी कंपनीत उत्पादन घेण्याचे काम सुरू असताना कंपनीच्या पावडर प्लान्टला आग लागली. सुरुवातीला आग विझविण्याचा प्रयत्न कामगारांनी केला. मात्र कंपनीत आग पूर्ण पसरल्याचे समजताच कामगार कंपनीबाहेर पडले. कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

आणखी वाचा-उरणच्या नव्या तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव, ५३ कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी

तळोजा औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केले. मात्र काही मिनिटांमध्ये संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत होते. आगीची भीषणता एवढी तीव्र होती की या कंपनीतील फुटणाऱ्या रायानिक पिंपांचा आवाज अर्धा किलोमीटरपर्यंत पोहचत होता. हवेत धुराचे आणि आगीच्या ज्वालांचे लोट पाच किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होते. या आगीच्या घटनेनंतर पडघे गावातील रहिवाशांनी कंपनीजवळ एकच धाव घेतली. मात्र कंपनीतून होणाऱ्या रासायनिक स्फोटांच्या आवाजाने शेजारील कंपनीतील कामगार आणि पडघे गावचे गावकरी हादरून गेले.