बऱ्याच दिवसांनी आज दिवसभर दमदार पावसाने नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात हजेरी लावली होती. संध्याकांतर सुद्धा काही ठिकाणी पावसाची संततधार कायम सुरु असल्याचं बघायला मिळालं. पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले, रस्ते वाहतुकीलाही याचा फटका बसला.
मुसळधार पावसामुळे उरण व जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीवर काही प्रमाणात परिणाम झाला, या भागातील वाहतुक मंदावली होती. तर समुद्र किनारी भागात पावसाच्या हजरीमुळे मासे सुकविण्यासाठी अडचण येत असल्याचे बघायला मिळाले, मासे परत समुद्रात टाकावे लागत असल्याने मच्छिमारांना नुकसान सहन करावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>उरण मधील ग्रामीण आरोग्य व्यवस्था झोपी गेली

नवी मुंबईत दिवसभर पावसाची हजेरी होत, सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे ,ऐरोली विभागात झाला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कोपरखैरणेत ७२ मिमी, ऐरोली विभागात ६८.६० मिमी तर दिघ्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली होती. नवी मुंबई शहरात सायन पनवेल महामार्गासह शिळ फाटा,ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक मंद गतीने सुरू होती. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या, यामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती.सकाळी ११ नंतर पडलेल्या मुसळधार पावसाचा शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. संपूर्ण नवी मुंबईत बेलापूर ,नेरुळ, वाशी विभागात ऐरोली कोपरखैरणे,दिघ्याच्या तुलनेत कमी पाऊस होता. बेलापूर येथे झाड पडल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालिन विभागाने दिली.

हेही वाचा >>>नवी मुंबई : एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त होणार ?

नवी मुंबई शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतचा पाऊस मिमीमध्ये
बेलापूर- २७
नेरुळ- १२.८९
वाशी- १८.२०
कोपरखैरणे- ७२.००
ऐरोली- ६८.६०
दिघा- ५३
सरासरी पाऊस- ४९.९३ मिमी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain all day in navi mumbai uran amy