पनवेल: पनवेल परिसरात गुरुवारी सकाळपासून पावसाच्या जोरधारांना सूरुवात झाल्यापासून पनवेलमधील वीज व्यवस्था पहिल्यांदा कोलमडली. ग्रामीण पनवेलसह कळंबोली, कामोठे परिसरातील अनेक ठिकाणी वीज गायब झाली. गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार सूरवात केली. कामावर जाणा-या नोकरदारवर्गाची त्यामुळे धावपळ झाल्याचे चित्र होते. तळोजा येथील उपकेंद्रातून कळंबोली, लोखंड बाजारातील सूमारे ६० हजार वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र गुरुवारच्या पावसाची सकाळपासून सूरुवात झाल्यावर अचानक वीज पुरवठा बंद पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नवी मुंबई: एपीएमसीतील धोकादायक इमारतीतील नळ जोडणी खंडीत

कामोठे वसाहतीमध्ये सुद्धा बारा वाजता वीज गायब झाली. पनवेलच्या ग्रामीण भागात वीज गायब होणे ही नित्याचे असल्याने येथील वीज ग्राहकांना वीज पुरवठा खंडीत होण्याचा सामना करावा लागला. अखंडीत विज ग्राहकांना मिळावी यासाठी वर्षभरात दर आठवड्यातील एक दिवस काही तास दुरुस्तीच्या कामासाठी वीज महावितरण कंपनी वीज पुरवठा बंद ठेऊन दुरुस्तीची कामे हाती घेते. पावसाळ्यापूर्वी सुद्धा याचपद्धतीने झाडांच्या छाटणीसाठी वीज पुरवठा बंद ठेऊन कामे केली जातात. तरीही विजेचा लपंडाव पावसाळ्यात सूरुच असल्याने घरातून संगणक व इंटरनेटवर काम करणा-यांची पंचाईत झाल्याचे चित्र पनवेलमध्ये अनेक ठिकाणी होते.