उरण : येथील विविध भागात ३.३० वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण झाले होते. यावेळी विजेचा कडकडाट सुरू होता ,त्यानंतर चार साडेचार वाजता जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. शहरातील विविध शाळांची सुट्टी झाल्याने लहान विदयार्थ्यांना या भर पावसातून प्रवास करावा लागत होता.
हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतील होती. तर दुसरीकडे सकाळी पासून कडक ऊन पडलं होतं. मात्र दुपार नंतर वातावरण बदलून आभाळ भरून आले होते. सध्या उरण शहर व परिसरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले.