पनवेल अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत नवी मुंबईसह पनवेल उरण तालुक्यांमधील महामार्गावर अवजड वाहतूकीस आज (शुक्रवारी) पहाटे ६ वाजल्यापासून मालाची वाहतूक करणा-या वाहनांना प्रवास बंदीचे आदेश नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी काढले आहेत. यानूसार ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात विशेषता जेएनपीटी बंदरात जाणा-या अवजड वाहनांना ब्रेक लागणार आहे. तसेच मुंबई व ठाणे भिवंडी येथून पनवेल व रायगडमध्ये जाण्यासाठी वापरला जाणारा शिळफाटा ते पनवेल आणि उरण या मार्गांवर वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूकांना अडथळा न होण्यासाठी ही बंदी ठेवण्यात आली असून या प्रवास बंदीसोबत रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा