गणेश उत्सव आता शेवटच्या टप्प्यात आला असून उत्साह सुद्धा शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होणार असून त्याची तयारी सुरूच आहे.  अनंत चतुर्दशीला सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतींची विसर्जन होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. हे लक्षात घेता कुठलाही वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शहरातील अंतर्गत भागात तसेच विसर्जन मार्गात जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती . मात्र त्यात आता अंशतः बदल करण्यात आले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उरणमध्ये धुके की प्रदूषणाचे धुरके ?

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात साजरा करण्यात येणा-या गणेशोत्सवच्या अनुषंगाने गणपती विसर्जनाच्या वेळी वाहतूक व गणपती मिरवणूका सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अवजड वाहनांना प्रवेश बंदी  करण्यात आलेली होती. त्यामध्ये बदल करुन खालील प्रमाणे अंशत: सुधारित अधिसुचना जारी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार

 २८ अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन तसेच  २९ तारखेला  ईद ए मिलाद हा सण असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतुक करणा-या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी  करण्यास पुर्णतः नमुद दोन्ही दिवशी बारा दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद चे मिरवणुक संपेपर्यंत बंदी राहील. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.