उरण : पाणजे क्षेत्र पाणथळ म्हणून घोषित करा याकरिता पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून राज्याच्या पर्यावरण विभागाने या संदर्भात १२ आठवड्यात निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पाणजे पाणथळ संदर्भात सिडकोविरोधातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे एकतर्फी आदेश ही रद्द केले असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. हे आदेश २४ जानेवारीला देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती जी.एस. पटेल यांच्या खंडपीठाने राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सिडको व्यतिरिक्त, एनएमआयआयएच्या (आधीचे नवी मुंबई सेझ) एका अधिकाऱ्याची तसेच पर्यावरण कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची सुनावणीसाठी उपस्थिती आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in