नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुलैअखेर डाळिंब, सीताफळ यांची आवक सुरु होत असते.तर ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढण्यास सुरुवात होते,परंतु अवकाळी पावसाने हंगामाला एक महिना लांबणीवर गेला आहे. डाळींब उत्पादनाला फटका बसला आहे. आता बाजारात केवळ ६ ते ८ गाड्या दाखल होत आहेत.दराने उच्चांक गाठला असून प्रतिकिलो कमीत कमी ८० रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचे डाळींब अडीचशे रुपयांनी विक्री होत आहे.तर  दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र डाळिंबाचे प्रमाण तुरळक पहावयास मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सूर्यनारायणाच्या अस्तानंतरही पथदिवे बंदच; नवी मुंबईत नागरिकांकडून संताप व्यक्त

हेही वाचा >>> उरणच्या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

सध्या एपीएमसी बाजारात राज्यातील सांगोला, सोलापूर नगर, फटलण, जेजुरी येथून डाळींब दाखल होत आहेत. यंदा पाऊस लांबल्याने, पडलेल्या अवकाळी पावसाने डाळींबाच्या बागांना फटका बसला आहे. दरवर्षी ऑक्टोबर- सप्टेंबर मध्ये २०गाडी आवक होत , परंतु आता केवळ ६-८गाड्या दाखल होत आहेत . यंदाच्या पावसामुळे डाळींबाच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरुवात होत आहे. त्यातही डाळींबाला तेली रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने डागाळलेले डाळींब बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींब आवक घटली असून परिणामी किरकोळ बाजारात तुरळक असून कमीत कमी १५० ते ३०० रुपयांनी विक्री होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High price of pomegranate in the wholesale market at rs 2500 per kg ysh