नवी मुंबई : शहरात पामबीच मार्गालगत असलेल्या करावे गावाच्या तलावाशेजारीच विस्तीर्ण गणपतशेठ तांडेल मैदान असून तेथे नेहमी प्रदर्शने भरत असतात. या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेला चौक वाहनांच्या वर्दळीमुळे व पाच रस्ते एकत्र आल्यामुळे धोकादायक बनला असून तेथे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या तांडेल मैदानाच्या बाहेर सातत्याने छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालिकेने योग्य ती सुधरणा करण्याची आवश्यकता आहे. सतत होणाºया अपघातांमुळे या चौकाबाबत पालिकेने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात धावणे-व्यायाम करण्यासाठी येणारे नागरिक करीत आहेत.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

हेही वाचा >>>नवी मुंबई : घटना जूनमधील गुन्हा दाखल ऑक्टोबरमध्ये, पीडित व्यक्तीचे दोन हात गेले… 

गणपतशेठ तांडेल चौकात करावे गाव व तलावाच्या दिशेने एक तसेच सीवूड्स डी मार्टच्या दिशेने तसेच सीवूड्स रेल्वेस्थानक दिशेने त्याचप्रमाणे पामबीच मार्गाने या चौकात अनेक वाहने एकाचवेळी येत असतात. तसेच या चौकात वाहतूक बेट नाही तसेच कोणतीही सिग्नल व्यवस्थाही नाही. त्यामुळे सर्वच दिशने वाहने वेगाने एकत्र येत असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. चौकाच्या कोणत्याच मार्गावर गतिरोधकसुद्धा नाहीत. त्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वेगाने आल्याने अपघात घडतात. याच भागातून ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या भागात पालिकेने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तांडेल मैदान परिसरात पाच रस्ते एकत्र आल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची मोठी अडचण होते. कुठून वाहन येते याचा अंदाजही वाहनचालक तसेच पादचाºयांना येत नसल्याने येथे अपघात होत आहेत. पालिका शहर अभियंता विभागालायोग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पत्र दिले आहे. – विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक

तांडेल मैदानाच्या समोरील चौकात कॉंक्रटीकरणाच्यासमवेत वाहतुकीबाबत योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे. सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. –अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका