नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दर आता वधारले आहेत. सोयाबीन दरात वाढ झाल्याने आणि केंद्र सरकारने २० टक्के आयात शुल्क आकारल्याने तेलाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आवक कमी होत आहे, त्यामुळे तेलाचे दर वधारले आहेत. दोन महिन्यांपूर्वीही तेलाच्या दरात वाढ झाली होती आणि आता पून्हा दर कडाडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वर्षांपूर्वी तेलाच्या दराने उच्चांक गाठला होता, मात्र हळूहळू तेलाचे दर पूर्ववत झाले होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून तेलाचे दर स्थिरावले होते. परंतु आता पुन्हा तेलाच्या दराने उसळी घेतली आहे. सरकारने सोयाबीन, दर वाढवले आहेत, शिवाय २० टक्के आयात शुल्क लावल्याने दर वधारले आहेत. एपीएमसी बाजारात महिन्याला ७ ते आठ ८ टन तेलाची आवक होत असते मात्र मागणी वाढल्यामुळे तेलाचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे बाजारात तेलाची आवक ही कमी होत आहे, त्यामुळे ३० टक्के दर वधारले आहेत अशी माहिती एपीएमसी व्यापाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा… आता संचलन परवान्याची प्रक्रिया, विमान संचलनासाठीचा परवाना अर्ज लवकरच नागरी हवाई वाहतूक विभागाकडे

हे ही वाचा… उरण : बाह्यवळणचा ‘मार्ग मोकळा’, उरण बायपास मार्ग नव्या वर्षात कार्यान्वित होण्याची शक्यता

एपीएमसी बाजारात तेलाची आवक कमी होत आहे. त्याचबरोबर सरकारने सोयाबीन दर वाढवल्यामुळे आणि केंद्र सरकारने २० टक्के आयात शुल्क आकारल्याने तेलाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. – तरुण जैन, घाऊक व्यापारी, एपीएमसी

तेल आधीचे दर (प्रतिकिलो)आताचे दर (प्रतिकिलो)
सूर्यफूल तेल
१२० रु. १४० रु.
पाम तेल १०० रु. १३५-१४० रु.
सोयाबीन तेल ११५-१२० रु. १३०-१३५ रु.११५-१२० रु. १३०-१३५ रु.
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hike of 30 percent in edible oil prices at apmc navi mumbai asj