नवी मुंबईतील पुनर्विकास लवकरच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. २५ एकर जागेवर भव्य स्टेडियम उभे करण्यात येणार आहे. नवी मुंबईच्या आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासनांची खैरात बंदरे खनिज मंत्री दादा भुसे यांनी केली. हिंदू गर्व यात्रा कार्यक्रमाच्या तयारी मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त ते ऐरोली येथे आले होते.

हेही वाचा- उरण पनवेल मार्गावरील करळ जवळ एनएमटी बसला अपघात

one terrorist killed in jammu
जम्मूत एक दहशतवादी ठार, लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार; सुरक्षा दलाचे जोरदार प्रत्युत्तर
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Eknath Shinde Family
Eknath Shinde : शिंदे सासू-सुना मुख्यमंत्र्यांच्या विजयासाठी कंबर कसून मैदानात, एकमेकींचं कौतुक करत प्रचारात सहभागी!
Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
In Thane CM Eknath Shinde stated Mahayutis strong performance will stem from work and development
महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आश्वासनांचा पाऊस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त गर्दी शिंदे यांच्याच मेळाव्याला करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून हिंदू गर्व गर्जना यात्रा अंतर्गत ऐरोलीतील लेवा पाटील सभा घेण्यात आली होती. यावेळी मुख्य मार्गदर्शन म्हणून बंदरे व खनिज मंत्री दादा भुसे हे आले होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेला कारभारावर स्तुतीसुमने उधळली. तसेच मातोश्रीवर टिका करताना थेट नावेही घेण्याचे टाळले. नवी मुंबईची मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शिंदे गटाने आश्वासनांची बरसात केल्याचे त्यांच्या भाषणात दिसून आले. नवी मुंबईतील ऐरोलीत ज्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे तसेच भव्य स्मारक छ. शिवाजी महाराज यांचे उभे करणार असल्याचेही भुसे म्हणाले.

हेही वाचा- उरणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडीत; सीसीटीव्हीवर परिणाम

२५ एकर मध्ये अत्याधुनिक स्टेडियम उभारणी करणार

मुंबई मनपा सफाई कामगार, परिवहन कामगारांचे प्रश्न सोडण्यात येणार आहे. तसेच जल वाहतुकीवर भर देणार डहाणू – पालघर ते मुंबई दरम्यान ठाणे नवी मुंबई सुद्धा त्यात असणार असे सांगत जल वाहतूक उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यात दिल्लीप्रमाणे मुहल्ला रुग्णालय सुरू करणार असंल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सफाई कामगार आणि परिवहन कामगारांच्या समस्या येत्या काळात सोडवणार आल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट बाळासाहेबांचा फोटो वापरतात म्हणून टीका केली होती. या टीकेला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशाचा बाप छ. शिवाजी महाराज आहेत. त्यांचा फोटो तुम्ही वापरू नका शिंदे यांची सेना हीच खरी शिवसेना असून दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठाकरेंवर जोरदार टीका

सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माजी विरोधीपक्ष नेता विजय चौगुले यांनीही उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका केली. ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांना भेट देत नसल्यावरुन जोरदार टीका केली. तसेच मात्र, आमचा मुख्यमंत्री असून कामे होत नव्हती . शिंदे हे तळागाळातून वर आल्याने त्यांना सर्वसामान्यांची जाणीव असल्याने शिंदे गटात गेले असल्याचेही ते म्हणाले.