लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : मालवाहतूकीच्या संपाचा सर्वाधिक फटका गुजरातहून पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणाऱ्या वटाणा शेंगा म्हणजे मटार या भाजीला बसला. इतर पालेभाज्यांची आवक मंगळवारपेक्षा बुधवारी पहाटे मोठ्या प्रमाणात झाली असली तरी मटार घाऊक व्यापाऱ्यांनीच चढ्या दराने खरेदी केल्याने याची आवक अतिशय कमी झाल्याचे बुधवारी पहाटे पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजारात पाहायला मिळाले.

बुधवारी घाऊक बाजारात १२० रुपयांनी किरकोळ व्यापाऱ्यांनी मटार खरेदी केला. त्यामुळे किरकोळ व्यापारी ते थेट गृहिणी आणि हॉटेल चालकांपर्यंत १४० रुपये प्रति किलोग्रॅमने विक्री होण्याची चिन्हे होती. मंगळवारी याच मटारची विक्री ६० रुपये प्रती किलोग्रॅमने घाऊक बाजारात झाली होती. दुप्पटीची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींना संपानंतर काही दिवस तरी चढ्या दराची मटारची शेंग स्वस्त होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

आणखी वाचा-महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल

पनवेलच्या बाजारामध्ये माल वाहतूक संपामुळे मंगळवारी ३३ वाहने भरुन भाजीपाला व कांदेबटाट्याची आवक झाली. मात्र संप माघारीची बातमी मंगळवारी रात्री समजताच पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजारात ४१ वाहनांमधून भाजीपाला व कांदाबटाट्याची आवक झाली. बुधवारी संप माघारीचे वृत्त अनेक किरकोळ भाजीविक्रेते व्यापा-यांना माहित नसल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात भाजी खरेदीसाठी गर्दी दिसत होती.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit by truck drivers strike peas become expensive mrj
Show comments