उरण: द्रोणागिरी नोड परिसरातील पाणजे गावाला जोडणाऱ्या मार्गावरील गवताला आग लावण्यात आली आहे. या आगीत रस्त्याच्या दुभाजक व कडेला असलेल्या वृक्षांची ही होळी होत आहे. यामध्ये सिडको कडून लाखो रुपये खर्चून लागवड करण्यात आलेली झाडे ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. मात्र सिडको याकडे दुर्लक्ष करत असल्याने सिडकोने या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण द्रोणागिरी नोड परिसराचा विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसराचा कायापालट आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणावरील गवताची छाटणी, विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन, जतन करण्यासाठी सिडकोकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु गवत छाटणीचा ठेका घेणारे ठेकेदार हे सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यात दरवर्षी धूळ फेक करत सिडकोच्या भूखंडावरील गवताची छाटणी न करता त्या गवताला आग लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या परिसरातील झाडे भक्ष्यस्थानी पडून प्रदुषणात वाढ होत आहे.

हेही वाचा… परदेशी वास्तव्य आहे? तर भारतातील घराकडे लक्ष द्या… बनावट दस्ताऐवजांसह बळकावले जाऊ शकते घर 

तरी सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील भूखंडावरील गवताची छाटणी न करता आग लावण्यात येत आहे. त्यामुळे सिडकोचे लाखो रुपये वाया जात आहेत. तर सिडकोने वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांची चौकशी करावी अशी मागणी सुनील पाटील यांनी सिडको कडे केली आहे.