माझी वसुंधरा अभियानामध्ये नवी मुंबई राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नावजले गेले असून यावर्षीच्या माझी वसुंधरा अभियानात पहिला क्रमांक कायम राखण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन केले जात असून, त्यामध्ये नागरिक सहभागावर भर दिला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>जिल्हा स्तरावर महिलांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट- गिरीष महाजन

‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारीवृंदाला महिला दिनाच्या शुभेच्छा देत माझी वसुंधरा अभियानाच्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या संकल्पनेतून मुख्यालयात विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित महिला अधिकारी, कर्मचारी यांना तुळशीची वृक्षरोपे प्रदान करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. तसेच त्यामधून पर्यावरणशील संदेश प्रसारित करण्यात आला. सर्व महिला कर्मचा-यांनी सामुहिकरित्या माझी वसुंधरा शपथ ग्रहण केली. यावेळी निश्चय केला नंबर पहिला हा घोष करण्यात आला.

हेही वाचा >>>नेरुळ विभागामध्ये कोट्यांवधीची वीजचोरी उघड करण्यात महिलांचे योगदान, २.३१ कोटींची विक्रमी वसुली

जागतिक महिला दिनाचा आनंदोत्सव नवी मुंबईकर महिलांनी उत्साहात केला साजरा

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त. सुजाता ढोले यांच्या समवेत समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव तसेच, माजी नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

तेव्हा बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले म्हणाल्या, “महिला आज सर्वच क्षेत्रात धडाडीने आघाडीवर असून अनेक क्षेत्रात तिने स्वत:चे अस्तित्व समर्थपणे सिध्द केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या मधल्या कालखंडानंतर होत असलेला आजचा महिला दिन हा आपल्या सावित्रीच्या लेकींचा हक्काचा आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे,” असं सुजाता ढोलेंनी म्हटलं.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honoring navi mumbai municipal women employees on international women day amy