वहाळ गावा शेजारीच असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील टेकडीच्या सपाटीकण सुरू असून या करिता बोर ब्लास्टींग केलं जातं आहे. त्यामुळे वहाळ गावातील शंभर पेक्षा अधिक घरांना भुंकपासारखे हादरे बसून तडे गेले आहेत. आशा प्रकारचे सुरुंग स्फोट दररोज केले जात असल्याने येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बोर ब्लास्टींग चे काम बंद न केल्यास विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी वाहळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सिडकोला दिला आहे.

हेही वाचा- महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेचा समारोप

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येथील डोंगर व टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोर ब्लास्टींगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यासाठी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे ठेकेदार अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.मात्र दररोज दुपारच्या वेळी बोर ब्लास्टींग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटाकांच्या प्रमाणाचा वापर मेसर्स. अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीकडून केला जात आहे. दररोज विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सर्वच रहिवाशांच्या घरांना हादरे बसू लागले आहेत.एखाद्या भुकंपाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ३०० घरांपैकी सुमारे १०० घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई: लाच घेऊ नका, देऊ नका, बसमध्ये प्रवास करीत जनजागृती

वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. घरातील तीनही भिंतीनाही तडे गेले असल्याने सातत्याने जीवमुठीत धरुनच घरात राहावे लागत आहे. मात्र, भीतीमुळे लहान मुलांना दुसऱ्या घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती केसरीनाथ दापोळकर यांनी दिली. तर आशाबाई दापोळकर या विधवा महिलेच्या घरातील घर, जीना, लाद्या,सिलिंगला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. आर्थिक ओढाताण करून बांधलेल्या एकमेव घरात दोन मुलांसह राहते. दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे वित्त, जिवितहानी होण्याच्या भीतीने घरात नाईलाजाने वास्तव्य करून राहतात असल्याची खंतही आशाबाईंनी व्यक्त केली आहे.बोर ब्लास्टींगच्या जबरदस्त हादऱ्यामुळे संपुर्ण घरच कमकुवत बनल्याने घर राहाण्यास धोकादायक बनले असल्याची व्यथा दामोदर धावजी पाटील यांनी मांडली.

हेही वाचा- नवी मुंबई: एपीएमसीस ट्रकला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे बसत आहेत. अनेक घरांना तडेही गेले आहेत. यामुळे वित्त व जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोर ब्लास्टींग बंद करण्यात यावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पुजा पाटील यांनी दिली. ही बाब गंभीर असल्याने या बोर ब्लास्टींगची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सुचना दिल्या असल्याची माहिती पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.