नवी मुंबई : नियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना नियोजित वाहतूक सेवा पुरविणे तसे मोठे आव्हानच आहे. मात्र गेली अनेक वर्षे नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा (एनएमएमटी) हे आवाहन पेलवत आहे. शहरांतर्गत वाहतुकीसह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर याठिकाणीसुद्धा ही सेवा दिली जाते. या सर्व वाहतुकीचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते, मार्ग नेमके कसे ठरविले जातात, बस गाडय़ांचे वेळेचे गणित नेमके कसे जुळवले जाते याबाबत नवी मुंबईकरांना सविस्तर माहिती ‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ उपक्रमातून मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई वाशी येथील  मराठी साहित्य संस्कृती मंडळ सभागृह सेक्टर ६ येथे शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. नवी मुंबई शहराला नियोजित शहर म्हणून ओळखले जाते ते येथील वाहतुकीची, रस्त्यांची येथील आस्थापना उभारणीची पद्धत यामुळे. दिवसेंदिवस नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. या वाढत्या लोकसंख्येबरोबर ओघाने सार्वजनिक व्यवस्थेवर येणारा ताण आलाच. गेली अनेक वर्षे नवी मुंबई महापालिका परिवहनतर्फे चालविण्यात येणाऱ्या बस गाडय़ांमधून काही लाख प्रवासी प्रवास करतात. या सर्व प्रवाशांचे नियोजन, बस गाडय़ांची वेळ, मार्ग ठरविणे यांसारख्या गोष्टींचे मोठे आव्हान महापालिका प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून पालिका पेलवत आहे. महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे ४५० हून अधिक बस गाडय़ा ७० हून अधिक मार्गावर धावत आहेत. परिवहन विभागाच्या बसगाडय़ांचे नियोजन कसे केले जाते  यासंबंधीची माहिती नवी मुंबईकरांना ‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ उपक्रमातून मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी थेट संवादाची संधी यानिमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.