नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधील हवेचा स्तर झपाट्याने खालावत असतानाच मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामाचा शेकडो टन राडारोडा नवी मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात रिता केला जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस येऊ लागला आहे. वाशी तसेच ऐरोली टोलनाक्यांवरून प्रदूषण नियंत्रणाची कोणतीही खबरदारी न घेता राडारोड्याने भरलेल्या गाड्या नवी मुंबई एमआयडीसीतील बंद दगडखाणी तसेच उलवे, वहाळ तसेच द्रोणागिरीच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत.

मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या कामातून निघणारा राडारोडा हा नेहमीच नवी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अधिकृत तसेच बेकायदा पद्धतीने टाकण्यात येतो. तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात महापालिकेने मुंबई, नवी मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा पद्धतीने होणारी राडारोड्याची वाहतूक रोखली होती. त्यांची बदली होताच पुन्हा ही वाहतूक सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वायुप्रदूषणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा – नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार बंद, १०० कोटींचे व्यवहार ठप्प

मुंबई आणि नवी मुंबईतील हवेचा स्तर खालविण्यामागे धुळीचे मोठे प्रमाण हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. ही धूळ बांधकामांमुळे निर्माण होते. मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेने बांधकामांच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या उपाययोजनांवर भर दिला आहे. यासंबंधीच्या काही नियमांच्या अंमलबजावणीचा आग्रह महापालिकेने धरताच मागील काही दिवसांपासून मुंबईतील राडारोडा मुंबई, ठाण्याच्या दिशेने नेण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र दिसत आहे.

उलवे, विमानतळ परिसरात मोठी भरणी

सुरुवातीच्या काळात मुंबईतून नवी मुंबईत आणण्यात येणारा राडारोडा हा एमआयडीसी भागात तसेच काही गावठाणांच्या लगत असलेल्या मोकळ्या भागांमध्ये रिकामा केला जात असे. नवी मुंबईतील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे कंत्राट घेत राडारोडा रिकामा करण्याच्या जागाही आखून देण्यास सुरुवात केली होती. मुंबईतील बांधकामांमधून निघणाऱ्या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी बांधकाम व्यावसायिक तसेच कंपन्यांकडून लाखो रुपयांची कंत्राटे वाहतूकदारांना दिली जातात. मुंबईत राडारोड्यावर प्रक्रिया करणारे केंद्र महापालिकेने उभे केले असले तरी हे प्रमाण फारच मोठे असल्याने बऱ्याचशा राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदार जागांचा शोध घेत असतात. मध्यंतरी नवी मुंबई विमानतळ परिसर तसेच या भागातील काही नव्या नगरांच्या निर्मितीसाठी आवश्यक जमिनीवर भराव टाकण्याचे कंत्राट मिळवून शेकडो गाड्यांची वाहतूक नवी मुंबईमार्गे उलवे तसेच आसपासच्या भागात सुरू असायची. यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून ना हरकत दाखलाही अनेकांनी मिळविला होता.

हेही वाचा – नवी मुंबईतील प्रदूषणाला राजकीय आश्रय? नागरिकांच्या तक्रारींकडे यंत्रणांचे दुर्लक्षच

वहाळला राडारोड्याचा डोंगर

उलव्यापासून काही अंतरावर असलेल्या वहाळ, गव्हाण फाटा परिसरात गेल्या काही वर्षांत अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणार राडारोडा टाकण्यात आला असून त्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करत न्यायालयातही धाव घेतली आहे. वहाळ भागात काही ठिकाणी अवैध पद्धतीने टाकण्यात आलेल्या राडारोड्याचे डोंगर तयार झाले असून यामुळे उलवे तसेच आसपासच्या भागात धुळीच्या प्रदूषणाने टोक गाठले आहे. याविषयी ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलन करूनही अजूनही या भागात अवैध पद्धतीने राडारोडा टाकला जात असल्याच्या तक्रारी आहेत.