पनवेल : दहा दिवसांपासून सुरू असलेले पनवेल तालुक्यातील नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र (नैना) रद्द करण्यासाठी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. रायगड जिल्ह्यातील विविध सरकारी प्रकल्पांची यामध्ये चर्चा करण्यात आली. नैनाविषयी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जयंत पाटील तसेच माजी आमदार बाळाराम पाटील, अॅड. सुरेश ठाकूर, अतुल म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. नैनाप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावू या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचे ठरले. या बैठकीतील चर्चेचा निरोप घेऊन पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके उपोषणकर्त्यांना भेटल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी जाहीर केला.