आपल्या पत्नीशी फोनवर अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीवर पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. स्वप्नील स्वामी असे आरोपी पतीचे नाव असून कमलाकर भगत असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- मुलाच्या अपहरणानंतर ५० कोटी रुपयांची मागणी करणारा तो व्हॉट्सॲवरील संदेश कोणी पाठविला होता…

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पनवेल येथील झवेरी बाजार परिसरात कमलाकर याने स्वप्नीलच्या बायकोची छेड काढली होती. तसेच कमलाकर फोनवर तिच्याशी अर्वाच्च भाषेतही बोलला होता. त्यामुळे चिडलेल्या स्वप्ननीलने झवेरी बाजार परिसर गाठत कमलाकरवर चाकूने हल्ला केला. मात्र, या घटनेनंतर स्वप्नीलने स्वत:हून पोलीस स्थानकात हजेरी लावत गुन्ह्याची कबूली दिली. हत्येचा प्रयत्न या गुन्ह्याखाली स्वप्नील कारवाई करण्यात आली आहे. तर जखमी कमलाकर याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली.