नवी मुंबईतील कामोठे वसाहतीमधील सेक्टर १० येथील पंचरत्न सोसायटीमधील राहणारे ३१ वर्षीय पालश रघुवंश विरेंद्र प्रताप सिंग यांनी आत्महत्या केली. पत्नी आणि ‘तो’ असा विचित्र मानसिक छळवणूकीच्या प्रकारातून पतीने मृत्यूला कवटाळले.

हेही वाचा- नवी मुंबई: लाच घेऊ नका, देऊ नका, बसमध्ये प्रवास करीत जनजागृती

या घटनेनंतर कामोठे पोलीस ठाण्यात पालश यांचे वडील विरेंद्र सिंग यांनी धाव घेऊन त्यांची सून व तीच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याने गुन्हा नोंदविला. फेब्रुवारी ते एप्रील महिन्यादरम्यान पालश यांना मानसिक त्रास देण्यात आल्याचे सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांची सून व तीचा प्रियकर या दोघांनी त्यांचे प्रेमात पालशची अडचण होत होती. पालशवर यापूर्वी जिवघेणा हल्ला सुद्धा झाला होता. परंतू सततच्या मानसिक तणावामुळे अखेर पालशने जिवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचे सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader