खारघर येथील रेयान इंटरनॅशनल विद्यालयात शिक्षणसेवक असलेल्या महिलेला अतिमद्यपान आणि सिगारेटचा नाद असल्याने तिच्या पतीने डोक्यात हातोडा घालून तिचा खून केल्याची घटना सोमवारी खारघर येथे केंद्रीय विहार सोसायटीत घडली. हत्येनंतर आरोपी स्वत:हून पोलिसांत हजर झाला. श्रीनिवास चीत्तूर असे आरोपीचे नाव आहे.
श्रीनिवास हा कामानिमित्त परदेशात असतो. गेल्या डिसेंबरमध्ये तो भारतात परतला. पत्नी पुष्पा (४१) ही मोबाइलवर ‘चॅट’ करीत असल्याने आणि सतत धूम्रपान करीत असल्याने श्रीनिवास याला राग होता. तिला संपवण्याच्या विचाराने श्रीनिवास याने घरात कोणीही नसल्याचे पाहून पुष्पाच्या डोक्यात हातोडा घातला. यात पुष्पा हिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने श्रीनिवास हा ठाण्यातील नातेवाईकांकडे गेला आणि त्याने सर्व हकीकत सांगितली. श्रीनिवास हा संगणक क्षेत्रात काम करतो.

Story img Loader