नवी मुंबई शहराचा आयकॉन ठरणारा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे वंडर्स पार्क जवळील विज्ञान केंद्र. नेरुळ येथील वंडर्स पार्क जवळच होणाऱे विज्ञान केंद्र दृष्टीक्षेपात असून पालिका १०९ कोटी खर्चातून साकारण्यात येत असलेल्या कामाला वेगात सुरवात झाली आहे.या कामासाठी पावसाळा कालावधी वगळून १८ महिन्याची कामासाठी मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या निर्मितीला कामाला गती आली असून हा प्रकल्प नवी मुंबई शहरासाठी हा आयकॉन ठरणार आहे.या प्रकल्पाचे तळमजल्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

सिडकोकडून विज्ञान केंद्रासाठीचा भूखंड वेगळा करुन १ एफएसआय़सह करारनामा झाला. त्यासाठी पालिकेने सिडकोला २४ कोटी १४ लाख रुपये भरणा केले. त्यामुळे मागील काही वर्ष प्रत्येक अर्थसंकल्पात कागदावर राहीलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारला जात आहे.शहरातील महत्वपूर्ण व नागरीकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु असलेल्या वंडर्स पार्क शेजारीच विज्ञान केंद्राची निर्मिती होणार असल्याने या विभागाला आणखीनच महत्व प्राप्त होणार आहे. नवी मुंबई शहरासाठी महत्वपूर्ण व शहराची नवी ओळख म्हणून ठरणाऱ्या या प्रकल्पाबाबत आयुक्त अभिजीत बांगर हे आग्रही असून महत्त्वपूर्ण व शहराचे आयकॉन ठरणाऱा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पावेळी व्यक्त केला होता.मुंबई, बंगळूर व पिंपरी चिंचवड शहराप्रमाणेच नवी मुंबईत एक विज्ञान केंद्र निर्माण होणार आहे.

हेही वाचा : १५ हजारांची लाच घेणाऱ्या IRS अधिकाऱ्याला कोर्टाने तब्बल २३ वर्षांनी सुनावली शिक्षा, पण इतकी वर्ष का लागली?

पालिकेने नेरुळ सेक्टर १९ अ वंडर्स पार्कच्या लगतच दहा हेक्टर भूखंडापैकी २ हेक्टरचा भूखंड वेगळा करण्यात आला आहे. येथील संपूर्ण भूखंड चिल्ड्रेन पार्क म्हणून सिडकोने राखीव ठेवला होता.त्यातील काही भागावर वंडर्स पार्क उभारले असून शिल्लक असलेल्या २ हेक्टर भूखंडावर पालिकेचे देखणे विज्ञान केंद्र आकारास येत आहे.सुरवातीला पालिकेने या ठिकाणी विज्ञान केंद्र तसेच व्हींटेज कार निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार निविदाही मागवण्यात आल्या होत्या.परंतू दोन वेळा फेरनिविदा काढल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. विज्ञान केंद्र या प्रकल्पातून व्हिंटेज कार प्रदर्शनी केंद्र वगळण्यात आले आहे. अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भव्य विज्ञानकेंद्र बनवण्यात येणार असून या केंद्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा दिल्या जाणार असल्याने भविष्यात हे विज्ञानकेंद्र नवी मुंबईच्या मानाचा तुरा ठरणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : २०२४ मध्ये मोदींना आव्हान देणारा नेता कोण? कोणते आहेत पर्याय?

विज्ञान केंद्र आजच्या लहान मुलांसाठी आकर्षक तसेच रोजच्या व्यवहारात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर काय आहे व भविष्यात याचा फायदा याची प्रचिती देणारे ठरावे यासाठी त्यामध्ये विविध विभाग करण्यात येणार असून पर्यावरण,जीवन,उर्जा,यंत्र व रोबोट,अंतराळ या महत्वपूर्ण घटकांचा त्याच्यात अंतर्भाव केला आहे.त्यामुळे हे विज्ञान केंद्र शहराबरोबरच युवा पिढीला आकर्षित करणारे शहरातील महत्वाचे केंद्र ठरणार आहे.नवी मुंबई प्रमाणेच शहराच्या आजुबाजुला असणाऱ्या विविध महापालिका क्षेत्रातील नागरीकांसाठी हे विज्ञान केंद्र आकर्षणाचे व पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.या केंद्राचे काम वेगात सुरु असून शहरातील नागरीकांना व युवापिढीला या केंद्राची उत्सुकता आहे.

कामाचे नाव

नेरुळ सेक्टर १९ अ मधील भूखंड क्रमांक ५० ब येथे विज्ञान केंद्र बांधणे.
अंदाजपत्रकीय रक्कम -८७ कोटी २६ लाख,२२ हजार ६६९ रुपये
निविदा रक्कम-१०९ कोटी ,१ लाख ६७ हजार ५०० रुपये

नवी मुंबई शहरात विज्ञानकेंद्रामुळे शहराला वेगळे महत्व प्राप्त होणार असून शहरासाठी हा प्रकल्प आय़कॉनिक ठरणार आहे. शहरासाठी हा प्रकल्प भूषणावह ठरेल यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या ठिकाणच्या प्रत्येक कामावर नियंत्रण असून काम वेगात सुरु आहे. – संजय देसाई,शहर अभियंता

सायन्स पार्कमधील प्रस्तावित आकर्षक बाबी…

अंदाजे बांधकाम १९,५०० चौ.मी.
तळमजला व त्यावर ३ मजले आकर्षक वास्तू

हेही वाचा : Video: मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसमोरच ‘बर्निंग कार’चा थरार! भर पावसात शिंदे ताफा थांबवून खाली उतरले अन्…; शिंदेंचे शब्द ऐकून ‘तो’ रडू लागला

संकल्पना

विज्ञान केंद्रात निसर्गासोबत कसे रहावे, परग्रहावर मानवास राहता येईल,भविष्यात आपल्यासाठीचे उर्जास्त्रोत कोठून मिळतील,भविष्यातील मनुष्याची कार्यपध्दती व प्रवास कसा असेल ही संकल्पना असणार आहे.

कामाचा कालावधी

पावसाळा वगळून १८ महिने
ठेकेदार- मे.पायोनिर फाऊंडेशन इंजिनिअर्स प्रा.लि.
काम पूर्ण करण्याची तारीख- २० नोव्हेंबर २०२३

Story img Loader