रस्त्यावर सिग्नलवर धार्मिक स्थळ परिसरात भिकाऱ्यांची संध्या वाढत आहे. अशा भिकाऱ्यांना पैसे न देता अन्नदान करावे असा विचार वाढत आहे. मात्र दिलेले अन्न एवढे जास्त झाले त्यात नावडता पदार्थ असेल तर सर्रास टाकून दिला जातो.नवी मुंबई सारख्या सर्वच मोठ्या शहरात भिकारी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. लाखोंची संपत्ती असूनही भिक मागणे हा जणू व्यवसायच सुरु झाल्याचा प्रकार समोर येतो. नवी मुंबईतही मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या आहे.यांची संख्या सर्वाधिक गर्दीच्या सिग्नलवर दिसून येते. लहान लहान मुलांनाही त्यात जुंपले जात आहे. यावर कुठचीच ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही आणि कायद्यातील कमकुवतपणामुळे आम्हीही हतबल असल्याचे अनेक पोलिसांनी सांगितले. भिकाऱ्यांना पैसे न देता अन्न द्यावे असा विचार आता जोर धरत असून त्यासाठी अनेकजण आवर्जून बिस्कीट पुडे, चिवडा फरसाणची छोटी छोटी पाकिटे गाडीत ठेवत असतात. मात्र याचा उलटाच परिणाम दिसत असून जे आवडेल ते खाल्ले जाते अन्यथा सरळ सरळ फेकून दिले जाते.
हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेचा कारवाईचा धाक ….आणी कचरा वर्गीकरणात वाढ
रस्त्यांची साफसफाई करताना दुभाजकातील झाडत असे अन्न आता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या ठिकाणाची स्वच्छता करताना सुका कचरा गोळा करून तो पुढे पाठवला जातो आता मात्र ओला कचरा जमा होत असल्याने येथेही वर्गीकरण करण्याची वेळ आली असल्याचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. हॉटेल मध्ये जेवणारे लोक अनेकदा मोठ्या प्रमाणात उरलेले मात्र उष्टे नसलेले अन्न बांधून घेतात व वाया न जाऊ देता कोणाच्या तरी पोटात जावे या उद्देशाने भिकाऱ्यांना ते दिले जाते.मात्र आवडते नसेल तर ते बिनधास्त फेकून दिले जात असल्याचे दिसून येत आहे. वाशी प्लाझा परिसरातील काही भिकाऱ्यांशी संवाद साधला असता नॉन व्हेज असेल तर मजा येते असले साधे अन्न, बिस्किटे, चिप्स खाऊन कंटाळा आला म्हणून आम्ही फेकून देतो असे उत्तर मिळाले. भुकेल्या व्यक्तीला अन्नदान हि शिकवण अनेक संतांनी दिली यासाठी मी भिकाऱ्यांना अनेकदा अन्न देतो. मात्र काही दिवसापूर्वी असे पाकीट दिल्यावर नॉनव्हेज हैं क्या ? असे त्या भिकाऱ्यांने केली मी नाही म्हटल्यावर काही अंतरावर जाऊन दुभाजकातील झाडत सरळ ते पाकीट भिरकावले गेले. अशा अनुभव प्राध्यापक असलेले अनुभव शर्मा यांनी सांगितला.
हेही वाचा >>> नवी मुंबई : महागाईचा असाही फटका…नारळपाणी महागले…किंमत माहित आहे का?
शहरातील वाढत्या भिकार्यांच्या बाबत राजकीय सामाजिक क्षेत्रातून चिंता व्यक्त होत असून आता त्यांच्यासाठी स्वतंत्र रात्र निवारा जेवणाची सोय आणि लहान मुलांच्यासाठी शाळा अशा उपायांची गरज व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अशा मुलांच्यासाठी मनपाच्या दिव्यांग शाळेत वेगळे वर्ग भरावले जात होते. असे उपाय केले गेले तरीही शेवटी नाईलाज असेल तर ठीक आहे मात्र धंदा म्हणून भिक मागणे सुरु करण्याची वृत्तीत बदल आवश्यक अशी प्रतीकीर्या मनपाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. दुभाजकात फेकलेले अन्न भटकी कुत्री जाण्याची धडपड करतात त्यात अपघाताची भीती असते शिवाय डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी येते अशाही समस्या उद्धाभवत आहेत अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचार्याने दिली.