रस्त्यावर सिग्नलवर धार्मिक स्थळ परिसरात भिकाऱ्यांची संध्या वाढत आहे. अशा भिकाऱ्यांना पैसे न देता अन्नदान करावे असा विचार वाढत आहे. मात्र दिलेले अन्न एवढे जास्त झाले त्यात नावडता पदार्थ असेल तर सर्रास टाकून दिला जातो.नवी मुंबई सारख्या सर्वच मोठ्या शहरात भिकारी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. लाखोंची संपत्ती असूनही भिक मागणे हा जणू व्यवसायच सुरु झाल्याचा प्रकार समोर येतो. नवी मुंबईतही मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या आहे.यांची संख्या सर्वाधिक गर्दीच्या सिग्नलवर दिसून येते. लहान लहान मुलांनाही त्यात जुंपले जात आहे. यावर कुठचीच ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही आणि कायद्यातील कमकुवतपणामुळे आम्हीही हतबल असल्याचे अनेक पोलिसांनी सांगितले. भिकाऱ्यांना पैसे न देता अन्न द्यावे असा विचार आता जोर धरत असून त्यासाठी अनेकजण आवर्जून बिस्कीट पुडे, चिवडा फरसाणची छोटी छोटी पाकिटे गाडीत ठेवत असतात. मात्र याचा उलटाच परिणाम दिसत असून जे आवडेल ते खाल्ले जाते अन्यथा सरळ सरळ फेकून दिले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा