नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक इमारत चार महिन्यापासून तयार आहे. मात्र त्याचे लोकार्पण अद्याप केले गेले नाही. या बाबत अनेकदा पाठपुरावा केला तरीही रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत जर लोकार्पण तारीख जाहीर केली नाही तर रेल रोको आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते ऐरोली दरम्यान दिघा येथे रेल्वे स्थानक इमारत बांधण्यात आली आहे. अनेक महिने उलटून त्याचे लोकार्पण करण्यात न आल्याने या परिसरातील सामान्य नागरिक, आय टी आणि एमआयडीसी मधील कामगार अधिकारी व अन्य घटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा >>>धक्कादायक! अडीच लाखात विकले १७ दिवसांचे बाळ..;आरोपीमध्ये आईचाही समावेश,वाचा प्रकार काय… 

ठाणे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ऐरोली कळवा एलिव्हटेड प्रकल्पाचा एक भाग दिघा रेल्वे स्थानक आहे. चार महिन्यापासून लोकार्पण करण्यास चालढकल होत आहे. याबाबत निवेदन आणि दोन स्मरणपत्र देण्यात आली. मात्र काही हालचाल नसल्याने रेल्वे प्रशासनास गांभीर्य नाही असा आरोप खासदार विचारे यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत जर लोकार्पण तारीख जाहीर केली नाही तर रेल रोको आंदोलन करण्याचा त्यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the inauguration date of digha station is not announced rajan vichare has warned of a rail strike amy
Show comments