नवी मुंबई : मी एमएसईबीमधून बोलतोय तुम्ही लाईट बिल भरले नसल्याने वीज खंडित केली जात आहे. असा फोन आला तर त्यावर विश्वास ठेऊ नका, तसेच फोनवरील व्यक्ती सांगते तसा मोबाईल ऑपरेट करूही नका असे वारंवार पोलीस आणि महावितरण जनजागृती करते. मात्र तरीही अनेकदा लोक अशा फोनला बळी पडतात. असाच प्रकार वाशी येथे घडला असून यातील आरोपीने २ लाख ५७ हजार ७९८ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नवी मुंबई : कामगाराने मित्राच्या मदतीने केली चोरी 

हेही वाचा – पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

वाशी येथे राहणारे जयकिशन शुक्ला नावाचे ८६ वर्षीय व्यक्ती राहत असून त्यांना २ तारखेला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वतः एमएसईबीमधून बोलत असल्याचे सांगत बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करत असल्याचे सांगितले. वीज बिल भरले असतानाही असे कसे होऊ शकते अशी विचारणा शुक्ला यांनी केली. त्यावर फोनवरील व्यक्तीने तुम्ही भरलेले बिल तपासण्यासाठी १ रुपया पुन्हा पाठवा असे सांगत ज्या क्रमांकावर पैसे पाठवायचे तो क्रमांक दिला. शुक्ला यांनी पैसे पाठवले मात्र ते पैसे आले नसल्याचे सांगत मोबाईल बँक माहिती विचारून घेतली व त्याद्वारे स्वतःच त्या माहितीचा गैरफायदा करून घेत शुक्ला यांच्या खात्यावरील २ लाख ५७ हजार ७९८ रुपये स्वतःच्या खात्यात वळती करून घेतले. तसा संदेश आल्यावर शुक्ला यांना ही बाब कळली. याबाबत त्यांनी वाशी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you get a call saying electricity is being cut off due to non payment of bills dont believe it it could be a scam ssb