लोकसत्ता टीम

उरण : मागील वर्षभरापासून उरणच्या वायु प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी उरण हे देशातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असतांना उरण मधील तहसील व नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये असंतोष आहे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग

गुरुवारी ही उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने २५० पेक्षा अधिकचा होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी हे वातावरण अपायकारक असल्याचे स्पष्ट होत आहे. हवेच्या ढासळत्या गुणवत्तेने उरणच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दिवसभराच्या धुरके सदृश वातावरणामुळे उरण तालुक्यात सर्दी- खोकला या श्वसनाच्या आजाराच्या प्राथमिक तक्रारी वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. उरण मधील नागरिकांनी उरण तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देऊनही मात्र याकडे स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कानाडोळा करीत आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : पामबीच विस्तार अडचणीत, सिडकोचे १२५ कोटी महापालिकेस अपुरे

उरण मधील धुळीकणाच्या प्रदूषणात दररोज वाढ होत आहे. ३०० पेक्षा अधिक हवेचा गुणवत्ता निर्देशांक असल्याने प्रदूषित शहर म्हणून नोंद झाली होती. त्यानंतर प्रदूषणाच्या मात्रेत वाढ सुरूच आहे. या मात्रेमुळे उरणची पुन्हा एकदा देशातील पहिल्या क्रमांकाच्या प्रदूषित यादीत नोंद असून काही दिवसातच उरण हे देशातील सर्वात प्रदूषित शहराच्या रांगेत पहिल्या स्थानावर येत आहे.या संदर्भात उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

उरण नागरपरिषदेचे सूचना फलक नादुरुस्त

उरण शहरातील वायु दृश्यमान दर्शविणारे डिजिटल फलक नादुरुस्त झाले आहेत. हे फलक दुरुस्त करणार असल्याची माहिती उरण नागरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिली.

Story img Loader