पनवेल, नवी मुंबई : नवी मुंबईत सर्वत्रच अवैध धंदे बंद करण्याच्या मनसूब्याने पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी शुक्रवारपासून ऑलआऊट ऑपरेशन हाती घेऊन पोलीस दलाला अॅक्श्नमोडमध्ये आणले. पोलीस आयुक्तालयात एकाच दिवशी ४१ विविध अवैध व्यवसायांवर पोलीस दलाच्या विविध पथकांनी धाडी घातल्या आहेत. यामध्ये ८५ टक्के धाडी अवैध मद्याचा व्यवसाय करणा-यांवर करण्यात आल्या आहेत. तर विना परवानगी गुटखा विक्री, गांजा सेवन, विदेशी सिगारेटी विक्री आणि जुगार अड्यांवरही पोलीसांनी धाडी घातल्या आहेत.

१४ जानेवारीला आयुक्त भारंबे यांचा नवी मुंबईच्या कार्यकाळातील पहिल्याच महिना पुर्ण होत असताना पोलीस दलाने एकाच दिवशी ही केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. नवी मुंबईचे तत्कालिन आयुक्त बिपीनकुमार यांच्या काळात ‘सभ कुछ चलता हे’ अशी स्थिती होती. आ. मंदा म्हात्रे यांनीही जाहीर आरोप करत पोलीस दलातील भ्रष्टाचाराची तक्रार राज्य सरकारकडे केली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सूधारण्यासाठी आयुक्त भारंबे यांना पाठविल्यावर अनेक बदल पोलीसदलाच्या कार्यपद्धतीत करण्यात आले.

Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
Action taken against bullet driver who makes loud noise
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?

खारघरमध्ये दारुबंदी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. परंतू पोलीसांच्या धाडीत खारघर गावात किराणा मालच्या दूकानात तब्बल ९७ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे.  तळोजातही सिडको मंडळाचे गृहनिर्माण होणा-या शिर्के कंपनीच्या मजूरकॅम्पमधील दूकानातही २० हजारांपेक्षा अधिकचा मद्यसाठा जप्त झाला. या परिसरात दारुबंदी नाही हेच या ऑलआऊट ऑपरेशनमध्ये उजेडात येत आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांमधील अवैध मद्यसाठ्यांवर धाडी हद्दीबाहेरील पोलीस पथकाने येऊन धाडी मारल्या. त्यामुळे स्थानिक पोलीसांची हफ्तेखोरी उजेडात आली. यापुर्वी अनेक पोलीस आयुक्त नवी मुंबईत होऊन गेले मात्र आयुक्त भारंबे यांची कार्यपद्धतीने पहिले पहाटेपर्यंत सूरु असणा-या लेडीज सर्व्हीसबार चालकांचे कंबरडे मोडत असताना अवैध दारु, जुगार आणि गुटख्याच्या व्यवसायावरील कारवाईमुळे  नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे.

तूर्भे ५

पनवेल तालुका ८

खांदेश्वर ३

सानपाडा ३

सीबीडी १

कोपरखैरणे १

रबाळे ४

पनवेल शहर १

न्हावाशेवा ३

कळंबोली १

तळोजा ३

खारघर २

एपीएमसी १

वाशी १

रबाळे एमआयडीसी १

उरण १

एनआरआय २

एकुण     ४१ कारवाई केली

Story img Loader