नवी मुंबई शहरात नो पार्किंग जागेतच बेकायदा पार्किंगची भाऊगर्दी होत असून शहरात दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न अधिक जटील बनत चालला असून गाडी घेऊन घराबाहेर पडताच,गाडी पार्क करायची कुठे अशी घरघर डोक्यात सुरु होते.नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात अनियोजित पार्किंगचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न अधिक जटील बनला आहे.
हेही वाचा >>> उरण : वादळी पावसाचा मासेमारीवर परिणाम ; ९० टक्के मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतल्या
नवी मुंबईत शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा प्रश्न पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. एकीकडे विकास आराखड्याबाबत अनेक त्रुटी समोर येत असताना अपुऱ्या पार्किंग सुविधेमुळे हा प्रश्न अधिक गंभीर रूप घेणार आहे.नवी मुंबई शहरात वाशी ते कोपरी पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला असून बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शनिवार व रविवारी तर सतरा प्लाझा समोरील बेकायदा पार्किंगवर तात्पुरती कारवाई केली जाते.परंतू वारंवार कारवाई करुनही पार्किंगचा प्रश्न सर्वच ठिकाणी जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा >>> मुंब्रा बायपास रस्त्यावर सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा; वाहतूक व्यवस्था विस्कळीत
शहरा अंतर्गत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे.कार्यालयीन वेळेबरोबरच संध्याकाळच्यावेळीही घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना पार्किंग करायचे तरी कुठे असा प्रश्न सातत्याने पडत आहे. बेलापूर ते दिघा प्रत्येक विभागात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.पार्किंग जागांपेक्षा गाड्या उदंड असे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे.नवी मुंबईचा क्विन नेकलेस असलेल्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतू याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते.या उपनगराच्या पहिल्याच आरेंजा सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते.आयुक्त तुकाराम मुंढे ते बांगर यांच्या कार्यकाळात आजही प्रश्न जैसे थे आहे.शहरात वाहतूक विभागामार्फत बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जाते.परंतू त्यांनाही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. सिडकोकडून पालिकेला पार्किंगसाठी मिळणाऱे भूखंड अद्याप लालफितीतच अडकले आहे. त्यामुळे शहरात पार्किंगबाबत ठोस उपाययोजना न झाल्यास नियोजित नवी मुंबई शहरात पार्किंग धोरणाचे तीन तेरा वाजतच राहणार असे चित्र आहे.
हेही वाचा >>> फी अभावी १८ विद्यार्थी वर्गाबाहेर; विद्यार्थ्यांच्या आईवर मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ
शहरात खाजगी आस्थापना,रुग्णालये पार्किंगबाबत हात वर करत असल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे.नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगबाबत सातत्याने कारवाई करण्यात येत असून वाढती वाहनांची संख्या व संबंधित स्थानिक आस्थापनांनी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नो पार्किंग जागेत गाड्या उभ्या केल्या तर कारवाई केली जाणारच .त्यामुळे नागरीकांनी नियमांचे पालन करावे.– पुरुषोत्तम कऱ्हाड ,उपायुक्त वाहतूक विभाग
शहरातील बेकायदा पार्किंगची ठिकाणे….
शहरातील सर्व रेल्वेस्थानकाच्या बाहेरील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा जागा,
नेरुळ बसडेपोचा परिसर
वाशी प्लाझा परिसर
मोराज सर्कलचा परिसर,
बेलापूर रेल्वेस्थानक कोकणभवन परिसर
कोपरखैरणे तीन टाकी परिसर
वाशी सेक्टर १७ परिसर
हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेच्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्राध्यापक भरती
गाड्या पार्क करायच्या तरी कुठे?
घरातून दुचाकी किंवा चारचाकी गाडी बाहेर काढण्यापूर्वीच गाडी पार्किंग करायची कुठे हा प्रश्न डोक्यात येतो.नवी मुंबई शहर नियोजनबध्द शहर असले तरी पार्किंगच्या नियोजनाबाबत उदासिनता आहे. पालिकेने पार्किंग प्लाझा तयार करावेत व सिडकोकडून पार्किंगसाठीचे भूखंड मिळवावेत एवढीच सामान्य नागरीक म्हणून अपेक्षा आहे.- उमेश परब, नागरीक
बहुमजली पार्किंगचे धोरण…….
नवी मुंबई शहरात पालिकेच्यावतीने पार्किंगसाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली जात आहे. उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्याखालील १३१ भूखंडाची मागणी पालिकेने केली आहे.त्यातील ३५ भूखंड मिळणे बाकी आहेत.परंतू या भूखंडाच्या ठिकाणी कोणतेही बांधकाम उभे न करता लॉन करता येणार आहेत.तर दुसरीकडे पालिकेने बहुमजली पार्किंगनिर्मितीला सुरवात केली आहे.
शहरात बहुमजली पार्किंगच्याबाबत सुरवात झाली असून बेलापूर येथे पहिल्या टप्प्यातील ४५० गाड्यांच्या बहुमजली पार्किंगचे काम सुरु असून वाशी सेक्टर ३० तसेच सीबीडी सेक्टर १५ येथे बहुमजली पार्किंग करण्याचे नियोजित आहे. – संजय देसाई,शहर अभियंता नवी मुंबई महापालिका