मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात अटींच्या अधीन राहून उपहार गृहे,हॉटेल यांना  पुरवठा करण्यासाठी २६जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता त्याचा गैरफायदा घेऊन काही व्यापाऱ्यांकडून कांदा बटाटा लसणाची अनधिकृतपणे किरकोळ विक्री केली जात आहे. याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनी  नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई: तळीरामांना दारू भोवली, दारुच्या नशेत बाईकची झाली चोरी…

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही घाऊक बाजारपेठ असून ५ ही बाजारात भाजीपाला, फळ, कांदा बटाटा,मसाले,धान्य या शेतमालाची त्या त्या बाजारात विक्री होत असून त्याव्यतिरिक्त इतर शेतमालाची विक्री करण्यातस मनाई आहे. भाजीपाला बाजारात सन २०२० मध्ये मध्ये उपहार गृह, जेल, हॉटेल मध्ये शेतमालासोबत कांदा बटाटा लसूण पुरवठा  करण्यासाठी २६ व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यात काही अटींचा समावेश करण्यात आला होता. 

हेही वाचा >>> खारघरमधील लिटील वर्ल्ड मॉलमधील सिनेमागृह कामगारांचा वाद पोलीस ठाण्यात

ज्यामध्ये  भाजीपाला बाजार आवारात कांदा  बटाटा लसूण विक्री करण्यात येणार नाही , बाजार आवारात आणलेला कांदा, बटाटा, लसून हा शेतमाल फक्त कॅन्टीन हॉटल, जेलईत्यादी घटकांना शेतमाला सोबत पुरवठा करण्याकरिता आणता येईल, असा आदेश बाजार समिती प्रशासनाकडून काढण्यात आला होता. मात्र बाजार आवारात  कांदा, बटाटा आणि लसणाची अवैध विक्री सुरू आहे. भाजीपाला बाजार आवारात तसेच प्रवेश द्वारावर नियमबाह्य पद्धतीने कांदा बटाटा विक्री केली जाते. याबाबत वारंवार एपीएमसी प्रशासनास तक्रार केल्या आहेत मात्र याकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. असे मत घाऊक कांदा बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal sale of onion and potato in the apmc vegetable market zws
Show comments