१ जानेवारी ह्या पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त देखण्या पालिका मुख्यालयावर आकर्षक रोषणाई केली जाते. २०२० मध्ये करोना प्रादुर्भावामुळे रोषणाई करण्यात आली नव्हती. गेल्यावर्षी करोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे रोषणाई करण्यात आली होती. तर यंदा निर्बंधमुक्त नववर्षाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला असताना नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर करण्यात आलेली रोषणाई पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
स्थानिक एनआरआय पोलीस स्टेशन व वाहतूक विभाग यांच्या चोख नियोजनामुळे पामबीच मार्गावर वाहतूक कोंडी झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. यंदा मात्र नववर्षाच्या उत्सवाचा जोश सर्वत्र पाहायला मिळाला होता.
हेही वाचा- नवी मुंबई: पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची मांदियाळी; नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी
नवी मुंबई महापालिकेचा नवीन मुख्यालयात कारभार सुरु झाल्यापासून दरवर्षी पालिका मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. देखण्या मुख्यालयाला आकर्षक विदुयत रोषणाईने देखणा साज चढवला जातो. त्यामुळे नवी मुंबई शहरातील नागरीकांबरोबरच शेजारील मुंबई, उरण, पनवेल, ठाणे परीसरातील नागरीक येथील आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. शनिवारीही नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. एकीकडे नवी मुंबईतील क्वीन नेकलेस समजला जाणारा पामबीच मार्ग तर दुसरीकडे देखणे पालिका मुख्यालय व त्यावरील आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी रात्रभऱ मोठी गर्दी करण्यात आली होती.पालिका मुख्यालया शेजराीच असलेला पामबीच मार्ग यामुळे रात्री १२च्या अगोदर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.या ठिकाणी तरुणाईचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. परंतू दुसरीकडे पोलीस व वाहतूक विभागाने गर्चोदीवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
हेही वाचा- पुढील एक वर्षासाठी गरिबांना मोफत धान्य मिळणार
चौकट- दरवर्षी पालिका मुख्यालयावर रोषणाई केली जाते.नववर्षाच्या स्वागतासाठी या परिसरात मोठी गर्दी होते.त्यामुळे येथील गर्दी टाळण्यासाठी व सुव्यवस्थितपणे रोषणाई पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांवर स्थानिक एनआरआय पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीसांनी योग्य ती व्यवस्था केली होती, अशी माहिती ,एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी दिली.
हेही वाचा- नवी मुंबई पोलीस भरती; २०४ पदांसाठी तब्बल १२ हजार ३७५ अर्ज
चौकट- पालिका मुख्यालयावर आकर्षक व देखणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्यामुळे स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. परंतू पोलीस व वाहतूक पोलीसांनी योग्य नियंत्रण ठेवले होते. ही रोषणाई ३०,३१,१ या तीन दिवस नागरीकांना पाहता येणार आहे, अशी माहिती विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता सुनील लाड यांनी दिली.